testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

रमझान

वेबदुनिया|

मुस्लिम दिनदर्शिके नुसार नववा महिना रमझानचा असतो. याच महिन्यात सर्वशक्तीमान अल्लाने मोहम्मद पैगंबर यांना दिव्य संदेश दिला. याच संदेशाचे एकत्रीकरण कुराण या पवित्र धर्मग्रंथात करण्यात आले आहे.

त्यामुळे महिन्याचे पावित्र्य पाळण्यासाठी या महिन्यात उपवास करण्याचा आदेश देण्यात आला आहे. या काळात उपवास करणे म्हणजे आत्मताडन करणे असा याचा अर्थ नसून सवर्शक्तीमान अल्लाप्रती समर्पण व्यक्त करण्याची संधी या महिन्यात मिळते.

कुणी आजारी असल्यास व प्रवासात असल्यास त्याला ते दिवस नंतर उपवास करून भरून काढण्याची मुभा आहे. रमझानच्या काळात श्रद्धायुक्त अंतःकरणाने उपवास केल्यास व सर्वशक्तीमान अल्लाच्या कृपेची याचना केल्यास मागचे सर्व पाप धुतले जाते, असे मानले जाते.
या काळात मुस्लिम बांधव दिवसभर उपवास करून रात्री हलका आहार घेतात. मित्र मैत्रिणी, नातेवाईक, परिचित यांच्या भेटीगाठी घेतल्या जातात. मुस्लिम धर्मात ज्या पाच पवित्र बाबी सांगितल्या आहेत,

त्या या काळात पूर्ण केल्या जातात. प्रार्थना, उपवास, जकात (दान) आणि आत्मपरिक्षण यांमध्ये हा महिना घालविला जातो. हा काळ संपूर्ण समाजाला बांधून ठेवणारा, एकत्र आणणारा आहे. ईद उल फितर ने या महिन्यातील उपवासाची सांगता होते.


यावर अधिक वाचा :

5 मिनिटात देवीला प्रसन्न करण्यासाठी करावा कुंजिका स्तोत्र ...

national news
अशी मान्यता आहे की नवरात्रीत नऊ दिवसात विधी-विधान पूर्वक दुर्गा सप्तशती पाठ केल्याने ...

नवरात्रीत या 4 सोप्या उपयांमुळे पैशाची चणचण दूर होईल

national news
नवरात्रीत नऊ देवींची आराधना केली जाते. देवी लक्ष्मीही दुर्गांचे रूप आहे. नवरात्रीत देवी ...

नवरात्रीत कन्या पूजन कधी आणि कसे करावे

national news
कन्या पूजनासाठी दोन ते 10 वर्षापर्यंत वयाच्या मुलींची पूजा करण्याची परंपरा आहे. दोन ...

सहाव्या दिवशी 'कात्यायनी' देवीची उपासना केली जाते!

national news
दुर्गेचे हे सहावे रूप कात्यायनी या नावाने ओळखले जाते. दुर्गा पूजेच्या सहाव्या दिवशी या ...

कन्या पूजनात आवश्यक आहे एक मुलगा

national news
नवरात्रीत कन्या पूजनाचे महत्त्व आहे परंतू केवळ कन्या पुजल्याने पूजा पूर्ण मानली जाणार ...

राशिभविष्य