गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. मुस्लिम
  4. »
  5. मुस्लिम धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

ईद-ए-मिलाद

(हजरत मोहम्मद पैंगबरांचा जन्मदिन)

id
- मोहम्मद इब्राहिम कुरैश

NDND
पैगंबर इस्लामी हजरत मोहम्मद यांचा जन्म सन 22 एप्रिल इसवी सन 571 ला अरबस्थानात झाला. 8 जून 632 ला ते इश्वराच्या भेटीला गेले. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ह्या उक्तीप्रमाणे लहानपणीच लोक त्यांना पाहून म्हणत असत की ''हा मुलगा मोठेपणी थोर माणूस होईल.'' एका अमेरिकन ख्रिश्चन लेखकाने (मायकॅल एच होर्ट) त्याच्या पुस्तकात जगातल्या 100 महामानवाचा उल्लेख केला आहे. त्यात हजरत मोहम्मद यांचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे.

  ''जो माणूस आपल्या रागावर नियंत्रण व संयम ठेवतो त्याचे जीवन अल्ला इमानदारीने भारून टाकतो.'' ''स्वर्गात ते अन्न नाही पोहोचत जे हरामाच्या कमाईचे असते. असे अन्न खाण्यापेक्षा आगीत जळून जाणे योग्य.''      
या पुस्तकात त्या लेखकाने म्हटले आहे, की ''ही एकमेव व्यक्ती इतिहासात होऊन गेली जी दोन्ही पातळ्यांवर (आध्यात्मिक व भौतिक) अतिशय यशस्वी ठरली. त्याचप्रमाणे इंग्रजी इतिहासकार टॉम्स कारलाईलने पैगंबरांना सर्व ईश्वराच्या दूतांमधले श्रेष्ठ म्हणून गौरविले आहे. अशा या हजरत मोहम्मदांमध्ये कोणते गुण आहेत. ते आपण पाहू....

त्यांनी माणसाच्या मनात हा विश्वास निर्माण केला की, ह्या सृष्टीचे चक्र ज्या सिद्धांतावर आधारित आहे, त्यावरच माणसाचे जीवनचक्र अवलंबून असावे. कारण मानव हाही ह्या विश्वाचाच एक भाग आहे. त्याविरुद्ध आचरण करणे हा प्रत्येक वाईट गोष्टीचा पायाच होय.

अल्लावरची श्रद्धा म्हणजे मनात रुजवलेली सात्त्विकतेची बी आहे, या बीला आयुष्यभर इमानदारीचाच फुलोरा येतो. असा माणूस न्यायाधीश, पोलिस वा त्यापारीही असला तरी त्याच्या क्षेत्रात मनातल्या ईश्वराशी प्रामाणिक असेल तर त्या राष्ट्राच्या राजकारणात, विदेशी धोरणात तसेच युद्धविषयक धोरणात त्याचे परावर्तन दिसतेच.

समाजाविषयी ते म्हणत, ''ज्यांनी खराब वस्तू विकली व त्या वस्तुच्या गुणवत्तेबाबत ग्राहकाला अंधारात ठेवल्यास त्यावर देवाचा कोप होतो व त्याचे पूर्वजही त्याचा धिक्कार करतात. याशिवाय त्यांनी विविध विषयांवर आपले मत व्यक्त केले. खाली त्यापैकी काही विचार दिले आहेत.
स्वत:शी प्रामाणिक असणे म्हणजे तुझी मैत्री व वैर त्या अल्लासाठीच असावी. तुझ्या मुखी देवाचे नाव असावे व तू दुसर्‍यांसाठी त्याच गोष्टी निवडण्यास ज्या तू स्वत:साठी निवडशील.''

''सर्वात योग्य व श्रेष्ठ व्यक्ती (इमानदार) तीच आहे, जिचे वागणे सर्वांसोबत सारखे व न्यायाचे आहे.''

योग्य 'मुजाहिद' तो आहे जो देवांच्या आज्ञेसाठी स्वत:च्या अंतरात्माशी लढेल व योग्य 'मुहाजिर' (अल्लाच्या प्राप्तीसाठी सर्वसंगपरित्याग करणारा) तोच जो ती कामे करणार नाहीत जी अल्लाला मान्य नाहीत.'

'मुसलमान सगळ्या प्रकारचा असू शकतो पण खोटारडा किंवा विश्वासघातकी कधीच नसतो. ''जो स्वत: पोटभर खातो पण त्याचा शेजारी उपाशी आहे असा माणूस स्वत:चे इमान राखत नाही. 'ज्याने लोकांना दाखवण्यासाठी रोजे ठेवले, उपास केले किंवा नमाज केला त्याने गुन्हा केला आहे.''

''चार अवगुण असे आहेत ते कोणत्याही व्यक्तीत असल्यास तो कपटाने वागणरा असतो - विश्वासून राहणारा, सतत खोटे बोलणारा, केलेला वायदा न पाळणारा, भांडणात मर्यादा ओलांडणारा.''

''जो माणूस आपल्या रागावर नियंत्रण व संयम ठेवतो त्याचे जीवन अल्ला इमानदारीने भारून टाकतो.'' ''स्वर्गात ते अन्न नाही पोहोचत जे हरामाच्या कमाईचे असते. असे अन्न खाण्यापेक्षा आगीत जळून जाणे योग्य.''