शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. मुस्लिम
  4. »
  5. मुस्लिम धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

कुराणाचे महत्त्व

कुराण वाचले जात असेल तेव्हा शांतपणे ऐका. गडबड, गोंधळ करू नका. जगात एकमेव असलेल्या त्या देवाची आपल्यावर कृपा व्हावी अशी इच्छा बाळगा. असे कुराणातच म्हटले आहे.

कुराण पठणाचे महत्त्व खूप आहे. जो कुराण वाचेल आणि त्यानुसार वागेल, संकटाच्या वेळी अल्ला ताला त्यांच्या आई वडिलांना एक मुकूट देईल. त्या मुकुटाचा प्रकाश सूयापेक्षा तेजस्वी असेल.

म्हणजे वाचणार्‍याच्या आई वडिलांना एवढे मिळणार असेल तर मग वाचणार्‍यांना किती मिळेल? असे कुराणात म्हटले आहे. जो कुराण वाचणार नाही, त्याला स्वर्ग मिळणार नाही.

नसते कुराण पाहिले तरी त्याला मोठे महत्त्व आहे. ज्याच्या लेखी कुराणाला महत्त्व नाही, ज्याला त्यातली एकही आयत म्हणता येत नसेल तर तो म्हणजे एकाद्या पडिक घरासारखा असल्याचे म्हटले जाते.

कुराण पाठ करून व न पाहता म्हणण्यापेक्षा पाहून वाचण्याला महत्त्व आहे. कारण कुराण पाहणे, त्याला स्पर्श करणे, त्याला जवळ बाळगणे हे धामिर्क दष्ट्या पवित्र मानले जाते. कुराणाचे भाषांतर करण्यासही बंदी आहे.