गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. »
  3. मुस्लिम
  4. »
  5. मुस्लिम धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

बहुपत्नीकत्व इस्लामला अमान्य

- शराफत खान

NDND
इस्लाम धर्माच्या बाबतीत अनेक गैरसमजूती आहेत. बहूपत्नीकत्वाला इस्लाममध्ये मान्यता आहे, ही गैरसमजूत त्यातलीच एक. स्वतः मुस्लिम असलेल्यांच्या मनातही ही गैरसमजूत घर करून आहे. वास्तविक मुस्लिमांचा पवित्र ग्रंथ असलेल्या कुराणचा नीट अभ्यास केला तर वास्तव काय आहे हे समजते. कुराणचा चुकीचा अर्थ लावल्याने ही गैरसमजूत उत्पन्न झाल्याचे समजून येते.

इस्लामचा उदय झाला तेव्हा बहूपत्नीकत्वाची प्रथा होती. अनेकांच्या शंभराहून अधिका बायका होत्या. एकापेक्षा जास्त बायका करण्यात गैर आहे असे कुणालाही वाटत नव्हते. बायकांना काहीही किंमत नव्हती. इस्लामाने या प्रथेला जोरदार विरोध केला आणि जास्तीत जास्त किती बायका करायच्या याची अंतिम मर्यादा निश्चित केली.

जास्तीत जास्त चार बायका करण्याचे बंधन इस्लामने घालून दिले. चार बायकांशी विवाह करणे हाही अपवाद मानला गेला. चार जणींशी विवाह करणे ही रूढी नव्हे तर परिस्थिती तशी असेल तरच तसा विवाह करावा असे सांगण्यात आले. यात बहुपत्नीकत्वाचे अजिबात समर्थन करण्यात आलेले नाही.

कुराणा सूर ए निसा मध्ये म्हटले आहे की आपल्या आवडत्या मुलीशी लग्न करावे. लग्न एक, दोन, तीन वा चौघीजणींशी करा (विशिष्ठ परिस्थितीतच). पण एकापेक्षा जास्त बायकांना समान अधिकार देऊ शकत नसाल तर कुणा एकीशीच लग्न करा. (मफूम)

यावरूनच एकच लग्न करावे, असे कुराणमध्ये म्हटल्याचे स्पष्ट आहे. बहुपत्नीकत्वाच्या प्रथेला इस्लामचे समर्थन नाही हेही यावरून स्पष्ट होते. मात्र, तरीही इस्लाममध्ये बहुपत्नीकत्वाचे समर्थन आहे, असा गैरसमज पसरविला जातो. विशिष्ट परिस्थितीतच बहुपत्नीकत्वाला अपवाद म्हणून मान्यता दिली आहे, तो काही नियम नाही हे लक्षात घेतले पाहिजे.