शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. अधिकमास
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 सप्टेंबर 2020 (12:19 IST)

अधिकमास विशेष : पुरुषोत्तम महिन्यात तिथीनुसार दान करा

पुरुषोत्तम महिन्यासाठी देणगी साहित्य, जाणून घेऊया तिथीनुसार काय देणगी द्यावी. पुरुषोत्तम महिन्यात श्री हरी विष्णूंच्या उपासनेसह तिथीनुसार देणगी दिल्याने माणसाला अनेक पटीने फळ मिळतं. त्याच बरोबर या महिन्यात कथा श्रवणाचे अत्यधिक महत्त्व आहे. 
 
हे माहात्म्य शुभ आणि फळदायी बनविण्यासाठी माणसाला या पुरुषोत्तम महिन्यात आपले आचरण अत्यंत शुद्ध आणि चांगल्या चरित्राचे असायला हवं. या पुरुषोत्तम महिन्यात देणगी देणं आणि धार्मिक कार्य करण्याचे खूप महत्त्व आहे. चला तर जाणून घेऊया पुरुषोत्तम महिन्यानुसार कोणत्या वस्तूंना देणगी द्यावं. 
 
पुरुषोत्तम महिन्यानुसार तिथीनुसार देणगी देण्याचे साहित्य :
 
* प्रतिपदेच्या दिवशी चांदीच्या भांड्यात तूप ठेवून दान द्या.
 
* द्वितीयेला कांस्य भांड्यात सोनं दान करावं.
 
* तृतीयेच्या दिवशी हरभरा किंवा हरभऱ्याची डाळ दान करावी.
 
* चतुर्थीच्या दिवशी खारीक देणगी देणं फायदेशीर असतं.
 
* पंचमीच्या दिवशी गूळ आणि तूर डाळ दान करावी.
 
* षष्ठीच्या दिवशी अष्टगंध देणगी मध्ये द्या.
 
* सप्तमी आणि अष्टमीच्या दिवशी रक्त चंदन दान करावं.
 
* नवमीच्या दिवशी केसर देणगी द्या.
 
* दशमीच्या दिवशी कस्तुरीचे दान करावे.
 
* एकादशीच्या दिवशी गोरोचन देणगी स्वरूपात द्या.
 
* द्वादशीच्या दिवशी शंख देणं फलदायी असतं.
 
* त्रयोदशीच्या दिवशी घंटाळी देणगी द्या.
 
* चतुर्दशीच्या दिवशी मणी किंवा मण्याची माळ देणगी द्या.
 
* पौर्णिमा किंवा अवसेच्या दिवशी माणिक किंवा रत्नाची देणगी द्या.