सुधारवादी संपादक डॉ.बाबासाहेब आंबेडकर

Widgets Magazine

अस्पृष्यांचे मुक्तीदाते व घटनाकार म्हणून प्रसिध्द असणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर श्रेष्ठ दर्जाचे पत्रकार आणि संपादकही होते. लोकमान्य टिळकांनी पत्रकारितेचा उपयोग परकीय इंग्रजा विरुध्द केला.त्यामुळे ते स्वजनात लोकप्रिय ठरले, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा लढा स्वकियाविरुध्द धर्मसुधारणेसाठी होता . त्यामुळे प्रस्थापित अशा स्वकिय यामध्ये त्यांची पत्रकारिता लोकप्रिय झाली नाही . 

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म मध्यप्रदेशातील महू येथे झाला. त्यांचे वडिल रामजी मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील आंबावडे या गावचे . ते सैन्यात सुभेदार मेजर होते. भिमराव हे त्यांचे चौदावे आपत्य. पाच वर्षाचे असतांनाच त्यांचे मातृछत्र हरपले . आंबावडेकर कुंटूंबावर संत कबीरांचा प्रभाव होता. वडिलांच्या सेवानिवृत्तीनंतर ते सातार्‍याला स्थायिक झाले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे प्राथमिक शिक्षण सातारा व मुंबईच्या इल्फिस्टन हायस्कूलमध्ये झाले. ते 1907 मध्ये मॅट्रिक, 1912 मध्ये बी.ए.झाले. बडोद्याचे राजे सयाजीाव गायकवाड यांनी शिष्यवृत्ती दिल्यानंतर ते उच्चशिक्षणासाठी अमेरिकेत गेले . 1913 ते 1916 दरम्यान त्यांनी कोलबिंया विद्यापीठात शिक्षण घेतले . एम.ए. पी.एच.डी. या पदव्या प्राप्त केल्या. काही दिवस बडोदा संस्थानात नौकरी केल्यानंतर त्यांनी नोव्हेंबर, 1918 ते जुलै 1920 या दरम्यान मुंबईच्या सिडेनेहॅम महाविद्यालयात वाणिज्य व अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापकाची नौकरी केली.

ब्रिटीश सरकारने त्यांना न्यायाधीशाची नौकरी देऊ केली होती. त्यांनी लंडनला जाऊन डी.एससी व बॅरिस्टर या पदव्या प्राप्त केल्या. मुंबईला परतल्यानंतर त्यांनी वकिली सुरु केली . हिंदू धर्मातील चातुर्वण्य पध्दतीमुळे दलितांचा होणारा छळ त्यांनी अनुभवलेला होता. या लोकांच्या उध्दारासाठी त्यांनी कार्य सुरु केले.



Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

आज-काल

news

ह्युंदाईची नवीन कार, ट्रॅफिकमध्ये स्वत:च काढेल मार्ग

दक्षिण कोरियाची कार बनविणारी कंपनी ह्युंदाई अशी एक कार बाजारात आणत आहे, ती वाहतूक कोंडी ...

news

दुधाचे अतिसेवन हानिकारक

दुधाचे सेवन आरोग्यासाठी अतिशय चांगले मानले जाते. दुधातील ड जीवनसत्त्व हाडे मजबूत करण्यात ...

news

शास्त्रीय संगीत श्रवण केल्यास सुधारते मेंदूचे कार्य

शास्त्रीय संगीत दररोज वीस मिनिटे ऐकल्यास मेंदूचे कार्य सुधारते, अध्ययन व स्मृती यांच्यात ...

news

सर्वाधिक मायलेज देणारी दुचाकी

आता ग्राहकांच्या सेवेत लवकरच भारतातील सर्वाधिक मायलेज देणारी दुचाकी हजर होणार आहे. ...