मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: सोमवार, 22 सप्टेंबर 2014 (16:57 IST)

शंभर वर्षांपासून उजाड झालेले गाव

तुर्कीमधील कयाकोय नावाचे गाव शंभर वर्षांपासून म्हणजे पहिल्या महायुध्दाच्या काळापासून उजाड झालेले आहे. या गावात कुणीही राहत नाही. टॉरसच्या डोंगरावरील हे गाव तसे सुंदर आणि टुमदार आहे, पण उजाड असल्याने ते भयानकही दिसते. 
 
या गावात कुणीही राहण्यास तयार नसल्याने त्याला काही बिझनेसमन आणि इंवेस्टरना विकण्याचे तुर्की सरकाने ठरवले होते. कुणी तरी त्याला खरेदी करून त्याचे रूपांतर पर्यटन स्थळात करावे अशी सरकारची इच्छा होती. जगभरात लोक इथे यावेत, राहावेत आणि हे गाव पुन्हा नांदते व्हावे अशी योजना होती. आता त्यादृष्टीने काही हालचाली सुरू आहेत. दोन बड्या कंपनीने त्यासाठी पावले उचलली आहेत. स्थानिक लोकांनी ग्रेको-टर्किश युध्दानंतर हे गाव सोडले होते. यापैकी बहुतांश लोक ग्रीसमध्ये स्थलांतरीत झाले होते. त्यावेळेपासून ते असे भकास झाले आहे.