शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: गुरूवार, 30 ऑक्टोबर 2014 (13:04 IST)

परीकथेच्या दुनियेत घेऊन जाणारे हॉटेल

एकसारख्याच वाटणार्‍या त्याच त्याच हॉटेलात जाऊन कंटाळलेल्या व काहीतरी नावीन्याच्या शोध असलेल्यांसाठी बार्सेलोनाच्या कॅटालोनियन शहरात एक आगळा कॅफे सुरू करण्यात आला आहे. इल बोस्क डी लेस फेड्स नावाचा हा कॅफे पर्‍यांच्या गोपनीय दुनियेच्या रुपात सजविण्यात आला आहे. मेणाच्या रुपातील सुंदर पर्‍या ठेवण्यात आलेला हा कॅफे सध्या बार्सेलोनातील लोकांसाठी सर्वात आगळ्या प्रकारचे आकर्षण ठरला आहे. 
 
आपल्या नावातूनच इल बोस्क डी लेस फेड्स कॅफे पर्‍यांच्या जंगलापासून प्रेरीत असल्याचे स्पष्ट होते. तिथे पूर्णत: कृत्रिम असलेल्या झांडीतून छोट्या छोट्या फांद्या डोकावतात, कड्यांवरून धबधबे कोसळतात, अडसर दूर करून प्रकाशकिरणे वाट काढत तुमच्यापर्यंत पोहचतात, भिंतीवरील आरशांमध्ये लपून असलेल्या सैतांनाचे आक्राळ रूप दिसते आणि अर्थातच पर्‍या असे एकंदर तिथले वातावरण आहे. खर्‍या नसल्या तरी अनेकजण या आगळ्या वातावरणात मंत्रमुग्ध होऊन जातात. या कॅफेच्या मुख्य खोलीत बसण्यासाठी हिरव्यागार भाज्यांचा गालिचा आहे. ही खोलीही परीकथेच्या धर्तीवरच सजविण्यात आलेली आहे. ज्या पर्यटकांना या स्थळाचा पूर्ण प्रभाव अनुभवायचा असेल त्यांच्यासाठी तिथे एक खासगी गुहा असून त्यात ते या गूढ जंगलाच्या तळापर्यंत जाऊ शकतात. एवढी हिंमत न दाखवू शकणारे छानपैक पर्‍यांच्या सहवासात या मोहवून टाकणार्‍या दुनियेची सफर करू शकतात.