शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: गुरूवार, 30 एप्रिल 2015 (12:33 IST)

ब्रह्मदेवाचे पुष्कर

ब्रह्मदेवाचे भारतात एकमेव मंदिर पुष्कर येथे आहे. पुष्करला लाखो भाविक रोज भेट देत असतात. राजस्थान हे उत्सवांचे माहेरघर आहे. पुष्कर मेला प्रसिद्ध आहे. अजमेर पुष्कर अंतर 15 कि.मी. आहे. अजमेर पाहून मी पुष्करला चारवेळा आलो. पुष्करचा उल्लेख महाभारतात आहे. महाभारताच वनपर्वात पुष्कर चे महत्त्व पुलसत्य ऋषी भिष्माला सांगतात. कार्तिकी पौर्णिमेला येथे वास्तव्य केल्यास पुण्य मिळते. 
 
येथील उंटाची जत्रा पौर्णिमेला भरते. श्रीरामाने पुष्करात तप केले. येथे विश्वामित्र ऋषींच्या तपाचा भंग मेनकेने केला या तीर्थाचा उल्लेख कर्नल जेम्सने केलेला आहे. पुष्करला उंटाचे शहर म्हणतात. पुष्कर तीर्थ स्नानासाठी प्रसिद्ध आहे. येथे गोघाट, ब्रह्मघाट, कपालमोचन घाट, ज्ञघाट, कोटीतीर्थ घाट असे 52 घाट आहेत. प्रत्येक घाटासाठी बिकानेर, ग्वाल्हेर इत्यादी संस्थानिकांच्या देणग्या मिळाल्या आहेत. 
 
ब्रह्मदेवाला यज्ञासाठी ही जागा योग्य वाटली. ब्रह्मदेवाच्या हातातून कमळ पृथ्वीवर पडले हे कमळ पुष्प तीन ठिकाणी पडले त्यातून बुढा पुष्कर, कनिष्ठ पुष्कर या ठिकाणी पाणी निर्माण झाले. या तिन्ही ठिकाणी ब्रह्म, विष्णू, भगवान ब्रह्मदेवाने यज्ञ केला पण सावित्री ही ब्रह्मदेवाची पत्नी लवकर आली नाही. यज्ञाचा मुहूर्त टळणार असे दिसताच ब्रह्मदेवाने आपली द्वितीय पत्नी गायत्रीला यज्ञासाठी मुख्य अतिथी म्हणून बसविले हे सावित्रीला सहन झाले नाही. तीने रागाने ब्रह्मदेवाला पृथ्वीवर पुष्कराशिवाय अन्य ठिकाणी तुझी पूजा होणार नाही, असा शाप दिला. येथे सावित्रीने एका पर्वतावर तप केले. 
 
येथील ब्रह्मदेवाचे मंदिर संगमरवरी आहे. येथील मंदिरात कुबेर संगमरवरी हत्तीवर बसलेला आहे. येथील महादेव मात्र पंचमुखी आहे. येथील ब्रह्मदेवास चार हात आहेत. येथील चांदीचे कासव सुरेख आहे. कासवाच जवळ सनकादि मुनी दिसतात. पुष्करमध्ये रंगनाथजी, बद्रीनारायण, वराह मंदिरे आहेत. मंदिरात विठ्ठल- रुक्मिणीच्या मूर्ती आहेत. विदेशी पर्यटकही पुष्करला मोठय़ा संख्येने येत असतात. 
 
 - जगदिशचंद्र कुलकर्णी