गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: गुरूवार, 30 ऑक्टोबर 2014 (12:59 IST)

वास्तूशिल्पकलेसाठी प्रसिद्ध मच्छीमारांचे शानदार शहर

फ्रान्समधील सेंट मालो सिटी नावाचे एक प्राचीन शहर आपल्या ऐतिहासिक वास्तूशिल्पकलेसाठी जगभरात प्रसिद्ध असून तिथली स्थापत्य कला पाहण्यासाठी दरवर्षी लाखोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. या शहरातील महाल, टॉवर, चर्च आणि त्यांच्याभोवती असलेल्या सुरक्षाभिंतीमध्ये थक्क करणार्‍या वास्तूकलेचे दर्शन घडते. 
 
नदी आणि समुद्राच्या किनार्‍यावर वसलेले सेंट मालो सिटी एकेकाळी समुद्री चाचे आणि मच्छिमारांचे शहर म्हणून ओळखले जात असे. मात्र आता ते फ्रान्समधील एक प्रमुख पर्यटन केंद्र ठरले आहे. या शहरातील वास्तूंची रचना पाहिल्यावर हे समुद्री चाच्यांचे शहर नव्हे तर वास्तूशिल्पकारांचे शहर असावे, असे वाटल्याशिवाय राहत नाही. इंग्लिश खाडी आणि रान्स नदीच्या किनार्‍यावर असलेल्या या शहरामध्ये मिळणारे स्थानिक भोजनालाही पर्यटकांची मोठी पसंती मिळते. त्यात खासकरून माशांचा समावेश असतो. या शहराची लोकसंख्या फार जास्त नसली तरी संपूर्ण युरोपमध्ये सर्वाधिक रेस्टॉरंट सेंट मालोमध्ये आहेत.