शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 9 जून 2015 (10:25 IST)

हीरो’च्या रिलीजपूर्वीच सूरज पांचोलीला लॉटरी

निखिल अडवाणी दिग्दर्शित ‘हीरो’मधून बॉलीवूडमध्ये पदार्पण करत असलेल्या सूरजला अन्य चित्रपटांचे प्रस्ताव येऊ लागले आहेत. विशेष म्हणजे त्याचा हीरो अद्याप रिलीज झाला नाही.

सूरज पांचोलीच्या हीरोची रिलीज डेट लांबणीवर पडली आहे. हा चित्रपट बघण्यासाठी आता सप्टेंबरपर्यंत वाट पाहावी लागणार आहे. मात्र सूरजला त्याचा पहिला चित्रपट प्रदर्शित होण्याअगोदरच अन्य चित्रपटांचे प्रस्ताव येऊ लागले आहेत. अजय देवगणच्या बॅनरकडून सूरजला हा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. रेमो डिसूजा या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत आहेत. अजय देवगणची या चित्रपटामध्ये प्रमुख भूमिका आहे. मात्र दोन हीरोंच्या कथेवर हा चित्रपट आधारित असल्याने यामध्ये सूरजला घेण्याचा विचार चालू आहे.

दोन भावांच्या कथेवर आधारित चित्रपटात सूरज अजयच्या छोट्या भावाच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. रेमोच्या अन्य चित्रपटांप्रमाणे हा चित्रपट देखील अँक्शन आणि डान्सने सजलेला असेल. सूरज हीरोच्या लूकमध्ये फीट दिसण्याबरोबरच तो उत्कृष्ट डान्सरदेखील आहे. सर्व गोष्टी जुळून आल्या तर चित्रपटाच्या शूटिंगचे पहिले शेड्यूल सप्टेंबर ते नोव्हेंबरच्या दरम्यान बँकॉकमध्ये सुरू केले जाऊ शकते.

विशेष म्हणजे सलमानच्या करिअरच्या सुरुवातीला आदित्य पांचोलीने त्याला मदत केली होती. त्याच्या बदल्यात आपल्या बॅनरच्या हीरोमध्ये तो सूरजला लाँच करत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनात तो स्वत: सहभागी होणार आहे.