बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

'विक्टरी'मध्ये धोनीची कथा !

WDWD
'इकबाल' व 'लगान' या चित्रपटांच्या कथानकाचे मुळ क्रिकेट होते. क्रिकेट हा सगळ्यांचे प्रिय असल्याने बॉक्स ऑफिसवर त्यांना चांगले यश मिळवता आले. त्याने प्रेरित होऊन दिग्दर्शक अजीत पाल यांनी 'विक्टरी' नामक चित्रपट तयार करत आहे. त्यात हिरोची भूमीका हरमन बावेजा साकारत आहे.

अधिकृत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 'विक्टरी'चे कथानक भारतीय क्रिकेट संघांचे कर्णधार महेन्द्रसिंह धोनी यांच्यावर लक्ष केंद्रीत करून तयार करर्यात आले आहे. धोनी प्रमाणे फिल्ममधील हिरो एका छोट्या शहरात राहणारा आहे. भारतीय क्रिकेट संघाचा एक भाग होण्याची त्याची मनीषा आहे. प्रयत्नांची पराकाष्टा करून यशाचे शिखर गाठतो व आपले स्वप्न पूर्ण करतो, हेच 'विक्टरी'मध्ये दाखविण्यात आले आहे.

'विक्टरी'मध्ये प्रसिध्द क्रिकेटपटू ही दिसायला मिळणार आहे. म्हणजे प्रेक्षक चित्रपट पहात आहे की, क्रिकेटचा सामना पहात आहे. यात चांगलाच गोंधळ होण्याची शक्यता आहे. यात ब्रेट ली, साइमन कॅटीच, सनथ जयसूर्या, मुरलीधरन, शोएब मलिक, हरभजनसिंह, युसुफ पठान प्रमुख आहेत. क्रिकेटपटूंच्या व्यतिरिक्त अमृता राव, अनुपम खेर व गुलशन ग्रोवर ही चित्रपटात काम करत आहे.

'लव स्टोरी 2050' सारख्या फ्लॉप चित्रपटापासून करियरचा श्रीगणेशा झालेल्या हरमनला 'विक्टरी' पासून खूप आशा आहेत. त्याला वाटत आहे की, 'विक्टरी'च त्याची गाडी रूळावर आणू शकेल.