गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 30 नोव्हेंबर 2015 (11:16 IST)

10 दिवसांत 1000 दिव्यांसोबत झाले ‘पिंगा’चे शूटिंग

रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण स्टारर ‘बाजीराव मस्तानी’ या सिनेमाचा ट्रेलर लाँच झाला आहे. ट्रेलरवरुन सिनेमाविषयीची उत्सुकता प्रेक्षकांमध्ये निर्माण झाली आहे. रणवीर-दीपिकाचा रॉयल लूक, प्रियांका चोप्राचा मराठमोळा लूक आणि सिनेमाचे भव्य सेटस् प्रेक्षकांना आकर्षित करत आहेत.
 
विशेषत: दीपिका आणि प्रियांकावर चित्रीत झालेल्या ‘पिंगा’ या गाण्यातील दोघींची जुगलबंदी प्रेक्षकांना भावली. मात्र या गाण्याला त्यांनी संमिश्र प्रतिसाद दिला आहे. अलीकडेच या गाण्याचे कोरिओग्राफर रेमो डिसुजा यांनी खास बातचित केली. रेमो म्हणतो, ‘या गाण्यासाठी मी बरेच दिवस चर्चा आणि सराव केला. त्यानंतरही याच्या चित्रांकनासाठी 10 दिवस लागले. यात 1000 खर्‍या दिव्यांसोबत शूटिंग पूर्ण केले.’