मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 10 डिसेंबर 2015 (10:09 IST)

10 वर्षांची असताना लैंगिक शोषण झाले: सोफिया हयात

सोफिया हयातने ट्विट करून खुलासा केला की, मी 10 वर्षांची असताना लैंगिक शोषणाची बळी ठरली होती. 6 डिसेंबरला तिने वयाची 31 वर्षे पूर्ण केली आहेत. त्या पृष्ठभूमीवर तिने ट्विट करून खुलासा केला की, ती 10 वर्षांची असताना लैंगिक शोषणाची बळी ठरली होती. 
 
जेव्हा ती लहान होती, तेव्हा तिच्या काकांनीच तिच्यावर बलात्कार केला होता. सोफियाच नव्हे अनेक सेलेब्स आहेत, ज्यांनी त्यांच्यासोबत झालेल्या लैंगिक शोषणाविषयी सांगितले आहे. यामध्ये बॉलीवूड अभिनेत्री कल्कि कोचलिन, महान सितारवादक रविशंकर यांची मुलगी अनुष्का दिग्दर्शक अनुराग कश्यप, प्रसिद्ध टॉक शो होस्ट आणि हॉलिवूड अभिनेत्री आणि निर्माती ओप्रा विन्फ्रे यांची नावे सामील आहेत.