Widgets Magazine
Widgets Magazine

‘अजय-इलियाना’चा सुफी संगीतावर रोमांस

शनिवार, 15 जुलै 2017 (11:06 IST)

baadshaho

बॉलीवूड अभिनेता अजय देवगन याच्या आगामी “बादशाहो’ चित्रपटातील पहिले गाणे “मेरा रश्‍के कमर…’ रिलीज झाले आहे. अजय देवगनने ट्विटरवर त्याचा व्हिडिओ जारी केला आहे. या गाण्यात सुफी संगातीवर अजय देवगनची अभिनेत्री इलियाना डिक्रूज सोबत रोमांटिक केमिस्ट्री पाहायला मिळणार आहे.
 
सुफी संगीताची परंपरा आणि प्रेक्षकांची या गाण्यांना मिळणारी पसंती पाहता श्रोत्यांसाठी आणखी एक पर्वणी ठरणार आहे. काही वर्षांपूर्वी सुफीयाना आवाजाने नुसरत फतेह अली खान यांच्या गाण्याचे हे सुरेख रिक्रिएटेड व्हर्जन आहे.
 
अजय देवगण “जुबान और जान सिर्फ एक ही बार दी जा सकती है’, असे म्हणत पुन्हा एकदा नव्या अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. “मेरे रश्‍के कमर’ या गाण्यात राजेशाही थाट, प्रेम, आर्तता आणि त्यातून या दोघांचे खुलणारे प्रेम या सर्व गोष्टींचा मेळ साधण्यात आला आहे.
 
मनोज मुंतशिर याने हे गाणे लिहिले असून या गाण्यात प्रसिद्ध सुफी गायक नुसरत फतेह अली खान आणि राहत फतेह अली खान यांच्या आवाजाने “चार चॉंद’ लावत आहेत. या दिवसांमध्ये रिक्रिएटेड व्हर्जन्स चर्चेत असणाऱ्या तनिष्क बागचीने या गाण्याचा मूळ आत्मा जपतच ते सादर केले आहे. “बादशाहो’ चित्रपट ऍक्‍शन थ्रिलर या प्रकारात मोडत असून अजय देवगण, इमरान हाश्‍मी, इलियाना डिक्रूझ, इशा गुप्ता आणि विद्युत जामवाल हे कलाकार यात झळकणार आहेत. हा चित्रपट 1 सप्टेंबर रोजी प्रदर्शीत होणार आहे.Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

रणवीर सिंगचा नवा लूक

अभिनेता रणवीर सिंहच्या चाहत्यांना तो दाढी-मिशांच्या लुकमध्ये खूप आवडला होता आणि रणवीरनेही ...

news

‘बाबुमोशाय बंदूकबाज’ चा ट्रेलर रिलीज

अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या ‘बाबुमोशाय बंदूकबाज’ या सिनेमाचा दमदार ट्रेलर रिलीज झाला ...

news

प्रियांका हॉलिवूड सिनेमाची निर्मिती करणार

अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता हॉलिवूड सिनेमाची निर्मिती करणार आहे. प्रियांका चोप्राची आई ...

news

शाहरुखने हल्ल्याचा निषेध करत दुख: व्यक्त केले

शाहरुख खाननेदेखील ट्विटरच्या माध्यमातून अमरनाथ यात्रेकरुंवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा ...

Widgets Magazine