testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मानधन ठरवण्याचे निकष हवेत- आलिया

Last Modified शनिवार, 7 जुलै 2018 (12:39 IST)
बॉलिवूडमध्ये नेहमीच कलाकारांच्या भारी कमाईच्या आकड्यांवरून जोरात चर्चा होत असते. हिरोच्या तुलनेत हिरोईनना मिळणारे मानधन नेहमीच कमी असते, अशी एक सार्वत्रिक तक्रारही ऐकायला मिळते. याच चर्चेमध्ये आलियाने एक मोठा मुद्दा उपस्थित केला आहे. कलाकारांचे मानधन ठरवण्यासाठी काही निश्चित निकष असायला पाहिजेत. विशेषतः थिएटरमध्ये प्रेक्षक खेचण्याची कोणत्या कलाकाराची किती क्षमता आहे, त्यावरच मानधनाचा आकडा निश्चित व्हायला हवा, असे आलिया म्हणाली. आलिया सध्या आपल्या करिअरच्या ऐन भरात आहे. तिने कोणत्याही बड्या अ‍ॅक्टरच्या अनुपस्थितीमध्ये राजीसारखा सिनेमा 100 कोटींच्याक्लबमध्ये नेऊन पोहोचवला आहे. जर वरुण धवन आपल्या स्वतःच्या बळावर आपल्या सिनेमासाठी अधिक प्रेक्षक खेचून आणू शकत असेल, तर वरुणपेक्षा अधिक मानधन मिळवण्यासाठी मी निर्मात्यांवर दबाव आणू शकत नाही, अशी थेट तुलनाच आलियाने केली आहे. यामुळे कलाकारांचे एकतर्फी मानधन किंवा भेदभाव केला जाऊ शकणार नाही. प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी सिनेमाचा विषयही महत्त्वाचा असतो हेही तिने स्पष्ट केले. केवळ पैसे मिळवण्यासाठी आपण कधीच सिनेमात काम करणार नाही. यापूर्वीही आपण तसे केलेले नाही, हेही तिने स्पष्ट केले.


यावर अधिक वाचा :

नशीबवान' भाऊंच्या 'उनाड पाखराची झेप'

national news
भाऊ कदम यांच्या बहुप्रतीक्षित 'नशीबवान' चित्रपटाचं नवीन गाणं 'पाखरू' रिलीज झाले आहे. एक ...

बॉक्स ऑफिसवर कसा राहिला सिंबाचा पाचवा दिवस?

national news
बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंह आणि सारा अली खानची फिल्म सिंबा बॉक्स ऑफिसवर धमाल करत आहे. ...

सासुबाईंचे हे सुनबाईंना सांगणे

national news
सुनबाईस...... नको जाउ धास्तावून सासुरवासाच्या दडपणाने अग मीही गेलेय ...

श्रेया, सोनूच्या जादुई आवाजातील "बघता तुला मी" गाणं ...

national news
"प्रेमवारी" या चित्रपटाचे पाहिलं गाणं 'बघता तुला मी' गाणं प्रदर्शित झाले. एकमेकांना ...

म्हणून जान्हवी कपूर शिकत आहे 'उर्दू'!

national news
'धडक' सिनेमातून रुपेरी पडद्यावर दमदार आगमन केल्यानंतर अभिनेत्री जान्हवी कपूर आपल्या आगामी ...

फेमिना ब्यूटी अवॉर्डमध्ये स्टार्सची जादू

national news
बुधवारी रात्री फेमिना ब्यूटी अवॉर्डमध्ये सिने कलाकरांची जादू चालली. या अवॉर्ड नाइटमध्ये ...

फेक कॉल करणारा झाला गप्प

national news
फेक कॉल करणारा झाला गप्प आजीला एक फेक कॉल आला तुमच्या पॅन डिटेल्स पाठवा लगेच. आजी: ...

अमिताभ बच्चन बनले फुटबॉल कोच

national news
बॉलीवूड सुपरस्टार अमिताभ बच्चन यांनी आपल्या आगामी चित्रपट 'झुंड' ची शूटिंग पूर्ण केली. हा ...

सिद्धार्थविषयी राग नाही : आलिया

national news
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने 2012 मध्ये 'स्टुडंट ऑफ दी इयर'मधून आपली कारकिर्द सुरू ...

मराठीत बोललीस की हिंदीत?

national news
एकदा नवरा बायको खूप भांडत असतात नंतर बायको लुंगी आणून नवर्‍याच्या अंगावर फेकते आणि ...