testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

बिग बी यांना पुन्हा एकदा झाली दुखापत

बिग बी अमिताभ बच्चन यांच्या हाताला पुन्हा एकदा दुखापत झाली आहे.
बिग बी नुकतेच विराट अनुष्काच्या रिसेप्शनला पोहोचले होते. तेव्हाही त्यांच्या हाताला बँडेज केलेले दिसले. यावर विचारले असता बिग बींनी बोलणे टाळले.

मात्र त्याच रात्री घरी गेल्यानंतर त्यांनी एक ब्लॉग लिहिला. यामध्ये कुली या चित्रपटाच्या शुटींग दरम्यान अपघात झाला होता. या अपघातावेळी झालेली जखम पुन्हा एकदा त्रास देऊ लागली आहे. ‘ठग्स ऑफ हिंदोस्तान’च्या सेटवर वजनदार वस्तू उचलल्यामुळे दुखापत झाली आहे यामुळेच हा त्रास होत आहे,असे बिग बींनी ब्लॉगमध्ये म्हटले आहे. ही दुखापत गंभीर नसुन लवकरच ती बरी होईल असेही त्यांनी सांगितले.


यावर अधिक वाचा :