testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

देवसेनाला बॉलीवूडमध्ये येण्याचा आग्रह करेल श्रीदेवी!

देवसेना म्हणजे अनुष्का शेट्टीला आता सर्व ओळखू लागले आहेत. बाहुबली 2 हिट झाल्यानंतर अनेक दिग्गज निर्माता दिग्दर्शक आपल्या चित्रपटात अनुष्काला घेऊ इच्छित आहे. या रेसमध्ये सर्वात पुढे आहे बोनी कपूर.
बोनी कपूरने अनुष्काला बॉलीवूडमध्ये लाँच करण्याची पूर्ण तयारी केली असून केवळ तिचा होकार येण्याची वाट बघत आहे असे सूत्रांचे म्हणणे आहे. बोनीची ही इच्छा श्रीदेवी पूर्ण करू शकते कारण हिंदीसह आजही दक्षिण भारतात श्रीदेवीची वेगळीच ओळख आहे. श्रीदेवी तिला बॉलीवूडमध्ये काम करण्यासाठी राजी करू शकते.
बोनी व्यतिरिक्त आदित्य चोप्रा आणि विधु विनोद चोप्रा हेदेखील रांगेत आहे. परंतू अनुष्काने सध्यातरी कोणालाही होकार कळवलेला नाही.


यावर अधिक वाचा :