Widgets Magazine

Bahubali 2: बाहुबली 2 ने 1500 कोटींचा पल्ला गाठला

'बाहुबली 2' चित्रपटाने 1500 कोटींचा पल्ला गाठला आहे. कमाईच्या बाबतीत या सिनेमाने शिखरच गाठलं म्हणावं लागेल. चित्रपटाने 1500 कोटींची कमाई केली असून अद्यापही घोडदौड सुरु आहे. हा आकडा नेमका कितीपर्यंत पोहोचणार आहे यावर सगळ्यांची नजर आहे.
बाहुबलीने पहिल्याच दिवशी 121 कोटी आणि जगभरात 217 कोटींची कमाई केली. नंतर 1000 कोटींची कमाई करत सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट होण्याचा मान आ‍धीच 'बाहुबली 2' ने मिळवला आहे. कटप्पाने बाहुबलीला का मारलं याचं उत्तर मिळविण्यासाठी प्रेक्षकांनी दोन वर्ष वाट बघितली होती आणि 28 एप्रिलला सिनेमा प्रदर्शित झाल्याबरोबरच बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. सिनेमाने आतापर्यंतचे कमाईचे सर्व रेकॉर्ड मोडीत काढले आहेत.
भारतातच नव्हे तर एकट्या अमेरिकेत 100 कोटींची कमाई करणारा बाहुबली हा पहिलाच भारतीय सिनेमा ठरला आहे. तर जगभरात 1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमाई करण्याचा मानही या चित्रपटाने पटकावला आहे.


यावर अधिक वाचा :