गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 17 जुलै 2021 (14:53 IST)

भारती सिंग ने दुखी मनाने सांगितले,लोकं शो दरम्यान अयोग्यपणे स्पर्श करायचे

कॉमेडी क्वीन म्हणून प्रसिद्ध असलेल्या भारती सिंगने आज स्वत: आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. भारती सिंग यांना हे विशेष स्थान मिळविण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जावे लागले.अलीकडेच भारती सिंगने मनीष पॉलच्या कार्यक्रमात तिच्या वैयक्तिक ते व्यावसायिक जीवनापर्यंत अनेक खुलासे केले.
 
भारती सिंग ने सांगितले की त्या आपल्या कारकीर्दीच्या सुरूवातीला आईला शो साठी घेऊन जायची.कारण शो दरम्यान लोक तिला अयोग्यरित्या स्पर्श करत असायचे.
 
भारती सिंह म्हणाल्या, बर्‍याच वेळा कार्यक्रमाचे संयोजक वाईट वागणूक देत होते.ते माझ्या पाठीवर हात ठेवायचे. जे मला अजिबात आवडत नसायचे,परंतु नंतर मला वाटायचे की ते तर माझ्या साठी अंकलप्रमाणे आहेत तर मग ते  माझ्याशी चुकीचे का वागतील ? 
 
ती म्हणाली, त्यावेळी मला या सर्व गोष्टी समजत नसायचा.आता माझ्यात संघर्ष करण्याचा आत्मविश्वास आला आहे, जो यापूर्वी कधीही नव्हता.आता मी म्हणू शकते की काय समस्या आहे,आपण काय बघत आहात, बाहेर जा आम्हाला कपडे बदलायचे आहेत.पण त्यावेळी हे असं म्हणायची माझ्यात हिम्मत नव्हती.
 
भारतीसिंग तिच्या बालपणीच्या कठीण टप्प्याबद्दलही बोलली. भारती म्हणाली,मी पाहिले आहे की काही लोक घरात कसे यायचे आणि त्यांनी दिलेल्या कर्जाचे  पैसे मागायचे.तर ते अगदी माझ्या आईचा हात देखील धरायचे.हे मला त्यावेळी माहित नव्हते की ते लोकं त्यांच्याशी वाईट वागत आहे. 
 
भारती सिंग 2 वर्षांच्या असतानाच त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यानंतर भारतीची आई एका कारखान्यात काम करायची आणि त्यांनी आपली तीन मुले वाढवली. भारती सिंगने अभिनयाबरोबरच मॉडेलिंगही केले आहे. तिने अनेक फॅशन डिझायनर्ससाठी रॅम्प वॉक केले आहे. भारतीने 2012 साली 'झलक दिखला जा' मध्ये नृत्य देखील केले होते.