testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

सलमान झुबेर वाद : सल्लूने मागितली कुत्र्यांची माफी

zubair

सलमानने झुबेरला “कुत्रा’ म्हटल्यामुळे मोठेच वादंग निर्माण झाले होते. एवढेच नव्हे तर सलमानने झुबेरला बॉलिवूडमधून “आऊट’ करण्याची धमकीही दिली होती. झुबेरने “बिग बॉस 11’मध्ये सहभागी होण्यासाठी थेट दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकरचे नातेवाईक असल्याचे भासवले होते, असा सलमानचा दावा आहे.

झुबेरला “बिग बॉस’ च्या घरातून बाहेर पडायला लागले आणि नंतर त्याने थेट सलमान विरोधा पोलिसांकडेही तक्रार दाखल केली होती. त्याने सलमानवर टीका करणाऱ्या मुलाखती देण्याचा धडाकाच सुरु केला.

सलमानने मारण्याची धमकी दिली, सलमानचे थेट दाऊदशी संबंध आहेत असे आरोपही झुबेरने केले होते. सलमानने माफी मागण्याची मागणी झुबेरने केली होती. मात्र विचित्र स्वभावाच्या सलमानने आपल्या स्वभावाला अनुसरून झुबेरची नव्हे, तर कुत्र्यांची माफी मागितली. मात्र झुबेरही यावर शांत बसला नाही. “माझ्यामुळेच सलमानने आपल्या भाऊबंदांची माफी मागितली.’ असे म्हणून झुबेरने सलमानचा डाव त्याच्यावरच उलटवला आहे.यावर अधिक वाचा :