मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 डिसेंबर 2016 (12:14 IST)

‘दंगल’ला एकही कट न देता सेन्सॉरचा हिरवा कंदील

बॉलीवूडचा मि.परफेक्टशनिस्ट आमिर खान याचा बहुप्रतिक्षित आणि बहुचर्चित असा आगामी ‘दंगल’ चित्रपट प्रदर्शित होण्यास केवळ एक आठवडा उरला आहे.
 
संपूर्ण कुटुंबाला एकत्रित पाहता येईल अशा या चित्रपटाला सेन्सॉर बोर्ड ऑफ सर्टिफिकेशन (सीबीएफसी)ने हिरवा कंदील दाखवला आहे.
 
‘दंगल’ चित्रपटातील एकाही दृश्याला कात्री न लावता सेन्सॉरने जगभरात हा चित्रपट प्रदर्शित करण्याची परवानगी दिली आहे. या चित्रपटाची लांबी २ तास ४१ मिनिटे इतकी आहे.