testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

आमीर खानचे सर्वच कौतुक , ‘दंगल’ सिनेमा केला टॅक्स फ्री

Last Modified शनिवार, 8 एप्रिल 2017 (11:05 IST)
दंगल’ पाकिस्तानात रिलीज करताना सिनेमातून भारताचा तिरंगा काढू नये, अशी ठाम भूमिका घेणाऱ्या अभिनेता आमीर खानचं सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. आता महाराष्ट्राच्या विधान परिषदेनेही आमीर खानचं अभिनंदन करण्यात आलं.

‘दंगल’ सिनेमा पाकिस्तानमध्ये रिलीज करताना भारताचा झेंडा काढा, तेव्हाच रिलीज करु, असा वाद निर्माण झाला होता. मात्र, अभिनेता आमीर खान यांनी ठाम भूमिका मांडत, याला विरोध केला. सिनेमातून तिरंगा न काढण्याची भूमिका आमीरने लावून धरली.

महाराष्ट्रातील विधान परिषदेत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी आमीर खानच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडला. त्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमीर खानचं अभिनंदन केलं आणि ‘दंगल’ सिनेमा टॅक्स फ्री करण्याची घोषणा केली.यावर अधिक वाचा :