Widgets Magazine
Widgets Magazine

धनुष तामिळ फिल्म प्रोड्यूसर कस्तूरी राजा याचाच मुलगा

शुक्रवार, 21 एप्रिल 2017 (17:57 IST)

मद्रास हायकोर्टाने संदर्भातील कातिरेसन आणि त्यांची पत्नी मीनाक्षी या तामिळ दाम्पत्याची याचिका रद्द केली. या तामिळ दांम्पत्याने धनुष हा त्यांचा मुलगा असल्याचे म्हटले होते. धनुषच्या उजव्या कॉलरबोनजवळ एक तीळ आहे आणि त्याच्या डाव्या बाजूने एक निशाणी आहे. त्यामुळे धनुषच त्यांचा मुलगा कलईचेवलन असून, जो २००२ मध्ये अभिनेता होण्यासाठी चेन्नईला पळून गेला होता, असा दावा या दांम्पत्याने केला होता.संबंधित दांम्पत्याची याचिका रद्द केली.
 
धनुष हा अभ्यासात कच्चा होता. त्यामुळे २००२ साली तो पळून गेला. यानंतर तो धनुष नावाने चित्रपटात काम करू लागला. त्याचे नाव कलाईसेल्वम आहे. त्याने मेलूरमध्ये आर सी हायर सेकेंडीरी स्कूल व गव्हर्नमेंट बॉईज हायर सेकेंडरी स्कूलमध्ये त्याने दहावीपर्यंत शिक्षण घेतले, असाही या दांम्पत्याचा दावा होता.
 
धनुषच्या वैद्यकीय तपासणीने या दांम्पत्याचा दावा खोटा ठरवला. वैद्यकीय अहवाल आणि अन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने धनुषच्या बाजूने निकाल दिला.धनुषचे खरे नाव व्यंकटेश प्रभू आहे. तो तामिळ फिल्म प्रोड्यूसर कस्तूरी राजा याचा मुलगा आहे. त्याच्या आईचे नाव विजयलक्ष्मी आहे.



Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

सोनाक्षी सिन्हाचा झाला साखरपुडा?

बॉलीवूडमध्ये चर्चा सुरू आहे की सोनाक्षी सिन्हाने बंटी सजदेहसोबत साखरपुडा केला आहे. पण ...

news

वादग्रस्त वक्तव्यामुळे सोनू निगमवर खटला दाखल

गायक सोनू निगम यानी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर लष्कर न्यायालयात खासगी ...

news

'महाभारत' या चित्रपटाची घोषणा होताच त्यावर वाद...

मल्ल्याळम अभिनेते मोहनलाल यांची प्रमूख भूमिका असलेल्या १००० कोटींच्या 'महाभारत' या ...

news

बाहुबली 2 सोबत डबल ट्रीट

अभिनेता प्रभासच्या ‘बाहुबली 2 : द कन्क्लूजन’ या सिनेमासोबतच प्रेक्षकांना आणखी एक ट्रीट ...

Widgets Magazine