testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

किंग खान ने दिली सलमानला लक्‍झरी कार भेट

मुंबई| Last Modified गुरूवार, 6 जुलै 2017 (09:40 IST)
बॉलिवूडचे करण-अर्जुन, अर्थात किंग खान शाहरुख आणि सुपरस्टार सलमान खान यांची मैत्री जगजाहीर आहे. याच मैत्रीखातर किंग खानने सल्लूला लक्‍झरी कार भेट दिल्याचे सांगण्यात येत आहे.
शाहरुखने ट्युबलाईटमध्ये कॅमिओ करण्यास होकार दिल्यास, आनंद राय यांच्या चित्रपटात गेस्ट अपिअरन्स करण्याचे सलमानने मान्य केले होते. किंग खानने त्याचे वचन पाळले, त्यामुळे साहजिकच सलमान शाहरुखची भूमिका असलेल्या आगामी चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे. दिलेला शब्द पाळण्यासाठी आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढण्यास सलमान राजी झाला, याचे सलमानला प्रचंड अप्रूप वाटले. त्यामुळेच एक नवीकोरी महागडी कार भेट देऊन शाहरुखने कृतज्ञता व्यक्त केली, असे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. ही कार नव्याने लॉंच झाली असून अद्याप हे मॉडेल कोणाकडेच नाही. शाहरुखचे गिफ्ट पाहून सलमानही अचंबित झाला. आनंद एल राय यांचे दिग्दर्शन असलेल्या आगामी चित्रपटाचे नाव अद्याप ठरलेले नाही. जब तक है जान तील अनुष्का शर्मा, शाहरुख खान, कतरिना कैफ हे त्रिकूट यानिमित्ताने पुन्हा एकत्र येणार आहेत. शाहरुख यात एका गाण्यात ठेका धरणार आहे.


यावर अधिक वाचा :

'पिप्सी'चे 'गूज'गाणे

national news
लहान मुलांची निरागस मैत्री आणि त्यांच्या भावविश्वावर आधारित असलेल्या 'पिप्सी' या ...

दोस्तीच्या धम्माल 'पार्टी'चा टीझर लाँच

national news
प्रत्येकांच्या आयुष्यात 'मित्र' हा असतोच! सुख-दुखांमध्ये निस्वार्थपणे सोबत देणारा हा यार ...

मैत्रीचा सुंदर कोमल गजरा

national news
परमेश्वराने मैत्रीचा सुंदर कोमल गजरा गुंफिला आहे कोणी हातात बांधला.. तर कोणी केसात ...

जान्‍हवीसाठी रक्षाबंधन आहे खास

national news
यंदा अभिनेत्री जान्‍हवी कपूरसाठी रक्षाबंधन खास आहे. ती या सणाची आतुरतेने, उत्‍सुकतेने ...

मराठीचा नादखुळा

national news
हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते.. संतोष - कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात ...