Widgets Magazine
Widgets Magazine

मधुर भांडारकरांना पोलीस संरक्षण

सोमवार, 17 जुलै 2017 (16:39 IST)

आगामी ‘इंदू सरकार’ या चित्रपटाला कॉग्रेसकडून होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर बालिवूडचे प्रसिद्ध चित्रपट निर्माता-दिग्दर्शक मधुर भांडारकर यांना राज्य सरकारकडून पोलीस संरक्षण पुरवण्यात आले आहे.

‘इंदू सरकार’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी भांडारकर हे दोन दिवसांपूर्वी नागपूर दौऱ्यावर असताना त्यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. मात्र, यावेळी कॉग्रेस सामर्थकांनी भांडारकर यांना आपल्या हॉटेलमधूनही बाहेर येऊ दिले नव्हते. त्याआधीही पुण्यातही असाच प्रकार घडला होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने भांडारकर यांना ही सुरक्षा पुरवली आहे.

या घटनेनंतर भांडारकर यांनी टि्वट करून “तुमचा या गुंडगिरीला पाठींबा आहे का? मला माझे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे की नाही?” असा प्रश्न कॉग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना केला होता. दरम्यान, या चित्रपटात इंदिरा गांधी यांच्याबाबत कोणतीही चुकीची माहिती आम्ही मांडलेली नाही. तसे करायचे असतेच तर मी शंभर टक्के माहितीपटच बनवला असता, चित्रपट बनवला नसता. असे स्पष्टीकरण मधुर भांडारकर यांनी दिले आहे.Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

बॉलीवूड

news

आयफा अवॉर्ड 2017 : शाहिद, आरिलाला सर्वश्रेष्ठ सन्मान

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये प्रतिष्ठेचा समजला जाणारा ‘आयफा ऍवॉर्ड ‘ सोहळा मेटलाइफ स्टेडियम ...

news

पुणे: 'इंदू सरकार'वरून मोठा गोंधळ

इंदू सरकारच्या प्रमोशनसाठी मधुर भांडारकर यांनी पुण्यात दोन पत्रकार परिषदांचं आयोजन केलं ...

news

Photo : प्रियंकाने केला मराठी चित्रपटाचा प्रचार !

बॉलीवूड अभिनेत्री प्रियंका चोप्रा तिच्या प्रॉडक्शनमध्ये तयार मराठी चित्रपट 'काय रे ...

news

‘अजय-इलियाना’चा सुफी संगीतावर रोमांस

बॉलीवूड अभिनेता अजय देवगन याच्या आगामी “बादशाहो’ चित्रपटातील पहिले गाणे “मेरा रश्‍के ...

Widgets Magazine