शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 25 फेब्रुवारी 2017 (08:58 IST)

‘पूर्णा’ या सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

राहुल बोस याने दिग्दर्शित केलेल्या ‘पूर्णा’ या सिनेमाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ‘पूर्णा’ हा सिनेमा पूर्णा मालवात या मुलीच्या आयुष्यावर बेतला आहे. पूर्णा मालवातने केवळ १३ व्या वर्षी माऊंट एवरेस्ट सर केले होते. पूर्णा ही एका आदिवासी मुलीची गोष्ट आहे. आपणही माउंट एव्हरेस्टवर चढून जाऊ असे स्वप्न पूर्णा बघते. पाहिलेल्या स्वप्नांची पूर्ती कशी होते हे दाखवणारा हा सिनेमा आहे. या सिनेमाचे पोस्टरही नुकतेच प्रदर्शित करण्यात आले होते. या पोस्टरची टॅग लाइनही सुरेख आहे. मुली काहीही करु शकतात अशी टॅग लाइन या पोस्टरला देण्यात आली आहे.