testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

ठरलं,‘2.0’चित्रपट २९ नोव्हेंबरला प्रदर्शित होणार

rajinikanth-and-akshay-kumars
Last Modified बुधवार, 11 जुलै 2018 (12:12 IST)
रजनीकांत, अक्षय कुमार, अॅमी जॅकसन यांच्या प्रमुख भूमिका असलेला ‘2.0’हा चित्रपट त्याच्या बिग बजेटमुळे चर्चेत होता. गेल्या काही महिन्यांपासून या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख वारंवार पुढे ढकलली जात आहे. अखेर या चित्रपटाच्या प्रदर्शनासाठी मुहूर्त सापडला असून २९ नोव्हेंबर २०१८ रोजी ‘2.0’हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक एस शंकर यांनी ‘2.0’नोव्हेंबरमध्ये प्रदर्शित होणार असल्याची अधिकृत घोषणा केली. २०१७ मध्येच या चित्रपटाचं चित्रिकरण पूर्ण झालं होतं. मात्र वीएफएक्स आणि इतर तांत्रिक बाबींमुळे या चित्रपटाचं प्रदर्शन लांबणीवर गेलं. ४५० कोटींचे बजेट असलेला हा चित्रपट जगभरात सुमारे १५ भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अक्षयचा हा पहिलाच तामिळ चित्रपट असून या चित्रपटात अक्षय खलनायकाची भूमिका साकारताना दिसणार आहे. हा चित्रपट २०१० साली प्रदर्शित झालेल्या ‘एंथरिन’चित्रपटाचा सिक्वल आहे.


यावर अधिक वाचा :

संजय जाधवला मिळाले वाढदिवसाचे वेगळे गिफ्ट

national news
मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्दर्शक व अभिनेता संजय जाधवला यंदा वाढदिवसादिवशी आगळे गिफ्ट ...

मलिष्काच्या 'गेली गेली मुंबई खड्ड्यात' गाण्याची जोरदार

national news
आरजे मलिष्का पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मलिष्काचं खड्ड्यांवरचं गाणं सध्या मोठ्या ...

सलमानने हाथी भाईना अशी केली होती मदत

national news
‘तारक मेहता का उलटा चष्मा’ या मालिकेतील डॉ. हंसराज हाथी ही भूमिका साकारणारे अभिनेता कवी ...

मुलं बाळं काय?

national news
आमच्या कॉलेजची मैत्रीण काल अशीच अचानक भेटली.. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, मग गाडी ...

इरफानने सुजीत सरकारचा चित्रपट साईन केला

national news
अभिनेता इरफान खान लवकरच एका चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. त्याने सुजीत ...