testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

दुसर्‍या दिवशी 11.30 कोटींची कमाई

मुंबई| Last Modified सोमवार, 14 मे 2018 (11:24 IST)
जंगली पिक्चर्स आणि धर्मा प्रॉडक्शन निर्मित राझी चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी धम्माल उडवून देणार्‍या राझीने दुसर्‍या दिवशीही चांगली कमाई केली आहे. पहिल्या दिवशी 7.53 कोटी रुपयांची कमाई करणार्‍या राझीने दुसर्‍या दिवशीही कोटींची उड्डाणे घेतली आहेत.
आलिया भट्ट आणि विकी कौशल यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या राझी चित्रपटाने 50 टक्क्यांच्या वाढीसह 11.30 कोटी रुपयांची कमाई केली आहे. त्यामुळे दोन दिवसांत राझीने एकूण 18.83 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

मेघना गुलजार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. बॉक्स ऑफिसवर कोटींची उ्‌डडाणे घेणारा राझी हा 2018 मधील पाचवा हिट चित्रपट ठरला आहे. सोनू के टीटू की स्वीटी (6.18 कोटी), हिचकी (3.31 कोटी), ऑक्टोबर (4.18 कोटी) या चित्रपटांना राझीने मागे टाकले आहे. 'राझी'चे दमदार ट्रेलर आणि म्युझिकने प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. प्रदर्शनानंतरही राझीने बॉक्स ऑफिसवर धम्माल उडवून दिली आहे. प्रेक्षकांचा मिणणारा प्रतिसाद पाहता हा चित्रपट चांगली कमाई करेल, असा विश्वास आहे.
1971 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धासंदर्भातील ही कथा आहे. आपल्या देशापुढे आणि कर्तव्यापुढे इतर कोणत्याही गोष्टींना महत्त्व न देणार्‍या एका धाडसी भारतीय गुप्तहेर स्त्रीची कथा यात आहे. यात भारतीय मुलगी (आलिया भट्ट) एका पाकिस्तानी लष्करातील अधिकार्‍याशी (विकी कौशल) याच्याशी लग्न करते आणि भारतासाठी गुप्तहेर म्हणून काम करते. राजकुमार हिरानी, अभिषेक बच्चन, जॅकी भगनानी, मौनी रॉय, विद्युत जामवाल यांच्यासह अनेक बॉलिवूड कलाकारांनी राझी आणि चित्रपटातील कलाकारांच्या अभिनयाचे सोशल मीडियावर कौतुक केले आहे.
आलियाचे वडील महेश भट्ट यांनीही तिच्या कामाचे कौतुक केले आहे.


यावर अधिक वाचा :

मुलं बाळं काय?

national news
आमच्या कॉलेजची मैत्रीण काल अशीच अचानक भेटली.. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या, मग गाडी ...

इरफानने सुजीत सरकारचा चित्रपट साईन केला

national news
अभिनेता इरफान खान लवकरच एका चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार आहे. त्याने सुजीत ...

ज्येष्ठ अभिनेत्री रीता भादुरी यांचे निधन

national news
प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेत्री रीता भादुरी यांचे मंगळवारी सकाळी निधन झाले. त्या निमकी मुखिया ...

तर बॉलिवूडध्ये आलीच नसती कॅटरिना

national news
सिंग इज किंग, वेलकम, एक था टायगर, जब तक है जान, अगदी अलीकडचा टायगर जिंदा है यासारखे अनेक ...

कर्मामुळेच देहाचं मूल्य हि वाढतं.....!!

national news
सोन्यात जेव्हा "हिरा" जडवला जातो तेव्हा तो दागिना ...