गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : सोमवार, 31 ऑगस्ट 2020 (18:14 IST)

सलमानचं कमिटमेंट ; पूरामुळे उद्ध्वस्त झालेल्या घरांच्या पुर्नबांधणीचं काम सुरु

गेल्या वर्षी महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली असून यामुळे नागरिकांचं मोठं नुकसान झालं होतं. यात लोकांची शेती, घरं सर्वकाही उद्ध्वस्त झालं होतं. तेव्हा अनेकांनी मदतीचा हात पुढे केला होता. त्यापैकी एक कमिटमेंट केलं होतं बॉलीवूड स्टार सलमान खानने. 
 
सलमान खानने कोल्हापूर जिल्ह्यातील खिद्रापूर हे गाव दत्तक घेऊन तेथील घर पुन्हा बांधण्याची घोषणा केली होती. सलमान खाने आपला शब्द पाळला असून या गावातील पूरामुळे उद्ध्वस्त झालेल्या घरांच्या पुर्नबांधणीचं काम सुरु करण्यात आलं आहे. या गावातील पडझड झालेल्या 70 घरांच्या पुर्नबांधणीची आर्थिक जबाबदारी सलमान खानने स्विकारली आहे.
 
राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी ट्विटच्या माध्यमातून सलमान खानचे आभार मानले आहेत. त्यांनी ट्विट करुन सांगितले की खिद्रापूर ता. शिरोळ येथील महापुरात पडझड झालेल्या घरांची पुर्नबांधणी करण्यासाठी एलान फाऊंडेशन (दिल्ली) व अभिनेते सलमान खान यांनी जबाबदारी घेतलेल्या ७० घरांच्या पायाभरणीचा शुभारंभ पार पडला.
 
सलमानने आपला कमिटमेंट पूर्ण करायला सुरुवात केल्याने अभिनेत्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.