Widgets Magazine

शाहिद-मीरा मुलीच्या बर्थडे सेलिब्रेशनसाठी लंडनला रवाना

shahid meera
Last Modified शुक्रवार, 11 ऑगस्ट 2017 (08:39 IST)
शाहिद कपूर हा आपली मुलगी मीशाच्या पहिला बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी लंडनला रवाना झाला आहे. मीशाला 26 ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होणार असून तिच्या पहिल्या वाढदिवसासाठी शाहिद आणि मीरा दोघेही खूप उत्हासिहत आहे.
शाहिदने नुकताच त्याच्या इंस्टाग्रमवर एक फोटो शेयर केला आहे. हा फोटो शेयर करत त्याने लिहिले की, मी फॅमेली व्हॅकेशनसाठी रवाना होत आहे. या फोटोत शाहिद, मीर आणि मीशा तिघे विमातळावर असल्याचे दिसून येतात. मीशा ही आईच्या कुशीत शांत झोपलेली आहे.

शाहिद कपूर काही महिन्यांपासून आपल्या आगामी “पद्मावती’ चित्रपटाच्या चित्रिकरणात व्यस्त असल्याने त्याला कुटुंबियांना जास्त वेळ देता आला नाही. मात्र, त्याने मुलीचा पहिला वाढदिवस खास पद्धतीने साजरा करण्यासाठी खास नियोजन केले आहे.


यावर अधिक वाचा :