Widgets Magazine
Widgets Magazine

आमिरच्या नई सोच शी जोडला जाणार शाहरुख

आमिर खान आणि शाहरुख खानच्या चाहत्यांना या दोघांनीही एकत्र काम करावे असे अनेक वर्षांपासून वाटत होते. दोघांच्या चाहत्यांची ही इच्छा आता लवकरच पूर्ण होणार. पण हे दोघे चित्रपटासाठी नव्हे तर एका टीव्ही जाहिरातासाठी एकत्रित येणार आहेत. सध्या अनेक कलाकारांना स्टार प्लस एकत्र आणत आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, स्टार प्लसच्या नई सोच या अभियानाशी शाहरुख लवकरच जोडला जाणार आहे तर आमिर खान आधीपासूनच या अभियानाशी जोडला गेला आहे.
शाहरुखने आमिर खानसोबतचा एक फोटो काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यांचा हा सेल्फी अनेकांना पसंत पडला होता. लवकरच टेड टॉक्सचे शाहरुख सूत्रसंचालन करणार आहे. याआधी शाहरुखने या शोचे सूत्रसंचालन का करणार आहे ते सांगितले होते. टीव्ही हे एक असे माध्यम आहे, ज्या माध्यमातून समाजाला चांगला संदेश देता येऊ शकतो. लोकांना एखादी गोष्ट सांगण्यासाठी हे खूप चांगले व्यासपीठ आहे.
या शोच्या माध्यमातून शाहरुख भारत आणि जगातल्या अनेक तरुणांना प्रेरित करू शकेल असे त्याला वाटते. या शोमध्ये अनेक मुद्यांवर चर्चा करून एकमेकांचे विचार कळतील. 18 मिनिटांचा हा कार्यक्रम असेल. टेड पहिल्यांदाच इंग्रजी भाषेपेक्षा वेगळ्या भाषेमध्येही प्रदर्शित केले जाणार आहे.


यावर अधिक वाचा :