बॉलीवूडमध्ये आल्यानंतर प्रत्येक अभिनेत्रीची इच्छा असते की शाहरूखसोबत आयुष्यात एकदा तरी काम करायला मिळावे. मात्र शाहरुख माझ्यासोबत काम करेल असे वाटत नाही असं अभिनेत्री सोनम कपूर हिने म्हटल आहे.
याआधी अनेकदा ड्रेसिंग, मेक-अप सेन्स असेल किंवा एखाद्या वादग्रस्त मुद्यावर मत मांडणे असो, सोनम नेहमीच चर्चेत असते. आता मात्र तिने खुद्द बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानबद्दलच तक्रार केल्याने अनेकांनी भुवया उंचावल्या आहेत.