testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

जुली 2’चा टीझर प्रदर्शीत (व्हिडीओ)

julee 2
Last Modified सोमवार, 4 सप्टेंबर 2017 (10:52 IST)
2004 मध्ये प्रदर्शीत झालेल्या “जुली’ या बोल्ड चित्रपटाने अभिनेत्री नेहा धुपियाला मोठी लोकप्रियता मिळवून दिली होती. आता याच चित्रपटाचा सिक्वल प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. नुकताच “जुली 2′ या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करण्यात आला आहे. साऊथची अभिनेत्री राय लक्ष्मी ही “जुली 2’मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून राय लक्ष्मी बॉलिवूडमध्ये एन्ट्री करत आहे.
साऊथमध्ये आतापर्यंत 50 पेक्षा जास्त चित्रपटामध्ये राय लक्ष्मी हिने काम केले आहे. तर काही बॉलिवूड चित्रपटांमध्ये तिने सहायक भूमिका साकारल्या आहेत. सोनाक्षी सिन्हाच्या “अकिरा’मध्ये तिने एक भूमिका साकारली होती. आता तिने या चित्रपटात अधिक बोल्ड अवतारात बघायला मिळणार आहे. या चित्रपटासाठी राय लक्ष्मीने तब्बल 11 किलो वजन कमी केले. बोल्ड भूमिकांसाठी लोकप्रिय असलेल्या या अभिनेत्री तिच्या इमेजला शोभेल अशीच भूमिका या चित्रपटात साकारली आहे. या चित्रपटात तिने अनेक बिकनी सीन्स आणि सेमी न्यूड सीन्स दिले आहेत. दीपक शिवदसानी याने “जुली 2′ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.


यावर अधिक वाचा :