मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: मंगळवार, 24 मे 2016 (17:13 IST)

WebViral सोनू निगम भेटला 12 रु. देणार्‍या मुलाला (व्हिडिओ)

नुकतेच प्रसिद्ध गायक सोनू निगमचा एक व्हिडिओ ‘द रोडसाइड उस्ताद’ सोशल मीडिया वर वायरल झाला, ज्यात तो वेष बदलून मुंबईच्या बर्‍याच जागेवर गाणे म्हणतो. या दरम्यान सोनूला लोकांनी ओळखले नाही.  
 
सोनूने त्याला 12 रुपये देणार्‍या मुलाचा शोध लावून घेतलं आहे आणि त्याला आपल्या ऑफिसमध्ये बोलावले. मुलाचे नाव शाहबाज़ अली सैयद आहे. शाहबाज़ जेव्हा सोनूला भेटला तर त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. 
 
या व्हिडिओत सोनू एका म्हातार्‍या माणसाच्या वेषात जुने जोडे घालून मुंबईच्या रस्त्यांवर हार्मोनियम घेऊन गाताना दिसत होता. कोणी त्याला ओळखले नाही, पण त्याची मधुर आवाज ऐकून थांबत जरूर होते.  
 
या दरम्यान एका युवकाने त्याला म्हटले होते की त्याला सोनूला शेकहॅड करायचे आहे आणि त्याने हळूच सोनूच्या हातात 12 रुपये ठेवले. या युवकाने सोनूला विचारले की अंकल आपने नाश्ता किया?   
 
नंतर सोनूने हे 12 रुपये फ्रेम करवून आपल्या ऑफिसमध्ये ठेवले आणि म्हटले की तो शाहबाज़ला शोधण्याचा प्रयत्न करेल, ज्याने त्याला 12 रुपए दिले.   
 
सोनूने शेवटी त्या मुलाचा पत्ता काढला आणि आपल्या स्टाफच्या मदतीने त्याला न सांगता आपल्या ऑफिसमध्ये बोलावले. आणि त्याचे स्वागत केले.  
 
कशा प्रकारे झाली सोनू आणि शाहबाज़ची ही भेट पहा व्हिडिओ.