बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

अंधश्रद्धाळू शिल्पा शेट्टी

IFM
शिल्पा शेट्टी कितीही आधुनिक असल्याचा देखावा करीत असली तरी ती पक्की अंधश्रद्धाळू आहे. आपल्या लव्ह लाईफबद्दल तिच्या भलत्या समजूती आहेत.

'लव्ह लाईफ'बद्दल जास्त बोलल्यास आपले नाते तुटेल अशी तिला भीती वाटते. यापूर्वी देखील बर्‍याचदा शिल्पाचे प्रेम सबंध संपुष्टात आले आहेत. त्यामुळे यावेळी ती कुठलाही धोका पत्करू इच्छित नाही. राज कुंदा नावाचा तरुण सध्या तिच्या आयुष्यात आहे.

सध्या ब्रिटनमध्ये तिच्यावरील पुस्तकाची मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. या पुस्तकाला आत्मचरित्र म्हणणे चुकीचे असल्याचे शिल्पाच्या प्रसिद्धीची जबाबदारी पाहणार्‍या डेल भगवागरचे मत आहे.

पुस्तकाची लेखिका ज्युली आजपर्यंत शिल्पाशी एक शब्द देखील बोललेली नाही. इंटरव्हू, टिव्ही. तसेच वर्तमान पत्रातील प्रकाशित लेखांच्या आधारावर तिने हे पुस्तक लिहिले आहे.

शिल्पा आत्मचरित्र जरूर लिहेन. पण त्याला अजून वेळ आहे. कारण तिला अजून बराच लांबचा पल्ला गाठायचा आहे, असे डेल सांगते.