गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 30 जुलै 2014 (16:32 IST)

अक्षय बनला गायक

अभिनेता सलमान खानच्या पावलावर पाऊल ठेवत अक्षय कुमारही आपल्याला गाताना दिसणार आहे. आगामी चित्रपट एंटरटेनमेंटमध्ये अक्षयने एक पूर्ण गाणे गायले असून याची माहिती स्वत: अक्षयने आपल्या ट्विटर अकाउंटवरून दिली आहे. 
 
नुकत्याच आलेल्या ‘कीक’मध्ये सलमानने ‘हँगओव्हर’ या गाण्याला आवाज दिला आहे. चित्रपटासोबतच या गाण्यालाही चाहत्यांनी डोक्यावर घेतले आहे. अक्षय कुमारचाही चाहतावर्ग मोठा आहे. 
 
चाहत्यांची भावना आणि सध्या चाललेला ‘ट्रेंड’ लक्षात घेऊनच अक्षयने या गाण्याला आपला आवाज दिला आहे. आपल्या चित्रपटात गाणे गायल्यानंतर अक्षय आता बिग बी अमिताभ बच्चन, शाहरुख, सलमान, आमिर, हृतिक यांच्या रांगेत जाऊन बसला आहे. यापूर्वी अक्षयने ‘सिंग इज किंग’मधील गाण्याचे बोल गुणगुणले होते.