शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 1 ऑक्टोबर 2014 (12:16 IST)

'अगाडू'ने मोडले'किक'चे रेकॉर्ड!

तेलुगू सुपरस्टार महेश बाबूच्या 'अगाडू' या चित्रपटाची निर्मितीपासूनच चर्चा होती. यात जबरदस्त अँक्शन आणि दृश्यांचा प्रभावीपणे वापर केला आहे. अमेरिकेमध्ये १६0 स्क्रीनवर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला आहे. 'अगाडू'ला केवळ आपल्या प्रीमियर शोद्वारे जवळपास ३.५0 कोटी रुपयांची कमाई करण्यात यश प्राप्त झाले आहे. कोणत्याही भारतीय चित्रपटासाठी हा एक नवा विक्रम आहे. यापूर्वी हा विक्रम सलमान खानच्या 'किक'च्या नावे होता. बॉलीवूडमधील आघाडीची अभिनेत्री असलेल्या नम्रता शिरोडकरचा पती महेश बाबू या 'पोक्किरी' या तेलुगू चित्रपटाचा नायक होता. त्याच्या 'वॉण्टेड'च्या रिमेकमुळेच सलमान खानच्या करिअरला जीवदान मिळाले. आता 'अगाडू' या नव्या चित्रपटाचे बजेट ७५ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. कोणत्याही दक्षिणेकडील अथवा हिंदी चित्रपटाच्या तुलनेत या चित्रपटाचे बजेट मोठे आहे. या चित्रपटामध्ये तमन्ना भाटिया नायिका आहे.