शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|
Last Modified: गुरूवार, 31 जानेवारी 2008 (17:18 IST)

अजय व काजोल चित्रपटात एकत्र

IFMIFM
अजय देवगण व काजोल हे दाम्पत्य आता एका चित्रपटाच्या माध्यमातून एकत्र येत आहेत. कुमार मंगत या निर्मात्याने या दाम्पत्याला घेऊन 'टुनपूर का सुपरहिरो' असे या चित्रपटाचे नाव आहे. चाळीस कोटी रूपये या चित्रपटासाठी खर्च करण्यात येणार असून हा भारतातील पहिला थ्री-डी व लाईव्ह एक्शन एनिमेशन चित्रपट असेल.

चित्रपटाचे दिग्दर्शन किरीट खुराणा करणार आहेत. खुराणा यांनी यापूर्वी अनेक जाहिराती आणि एनिमेशन चित्रपट केले आहेत. टुनपुर का सुपरहिरो एक वेगळा चित्रपट असेल. चित्रपटात काम करणारा हिरो एक दिवस अचानक कार्टुनच्या दुनियेत जातो आणि तेथेही तो सुपरहिरो होतो, असे कथानक आहे.

मुंबईत या चित्रपटाच्या मुहूर्ताचा क्लॅप करण जोहरने दिला. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते. चित्रपटाची गीते मुन्ना यांची असतील, तर संगीत अन्नू मलिकचे आहे.