शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 21 ऑक्टोबर 2014 (16:14 IST)

अनुष्काही घेणार 'पीके'चा ट्रान्झिस्टर!

अभिनेता आमिर खानने आपल्या 'पीके' या आगामी चित्रपटाचे फर्स्ट पोस्टर लाँच करून सर्वांना आश्‍चर्यचकित केले होते. आता आमिर नव्हे अनुष्काची वेळ आहे सर्वांना आश्‍चर्यचकित करण्याची. अनुष्का ट्रान्झिस्टर पकडून आपल्याला दिसणार आहे, असे आम्ही नव्हे स्वत: अनुष्का सांगतेय. अनुष्काने एक व्हिडीओ पोस्ट करून ट्विटरवर लिहिले, मला एकटक पाहायचे आहे तर त्याआधी हे पाहा. या व्हिडीओमध्ये अनुष्का म्हणतेय, बहुत टुकुर-टुकुर देख लिया पीके को अब मै आर ही हू.. ट्रान्झिस्टर पहन के! या पोस्टसाठी टीमने एक नंबर दिला आहे. या माध्यमातून पीकेची जाहिरात केली जाणार आहे. हा पहिला चित्रपट नाहीय, ज्याचे पोस्टर किंवा टीजर फोनवर पाहायला मिळणार आहे. यापूर्वी शाहरूखने आपल्या 'हॅपी न्यू इअर'चा ट्रेलर लाँच केला होता. आमिर खानच्या ट्रान्झिस्टरच्या पोस्टरने बरेच वाद उभे केले होते. हे प्रकरण कोर्टापर्यंत गेले होते. आता अनुष्का ट्रान्झिस्टरच्या लूकमध्ये कशी दिसणार हे पाहणे रंजक ठरणार आहे. चित्रपटाचे आतापर्यंत ४ पोस्टर लाँच झाले आहेत.