गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

आमीरचा 'सत्यमेव जयते' आता मराठीतही!

WD
मुंबई- बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमीर खानच्या 'सत्यमेव जयते' आता मराठीसह आठ प्रादेशिक भाषांमध्ये पाहता येणार आहे. यासाठी स्वत: आमीर खाननं मराठी प्रोमो शूट केला. मात्र, आठही भाषांमध्ये आमीरचा आवाज मराठीत डब केला जाणार आहे. मराठीतल्या सत्यमेव जयतेमध्ये आमीर खानचा मराठी आवाज बनला आहे, प्रसिद्ध मिमिक्री आर्टिस्ट डॉ. सुमेध शिंदे यांनी आमीरला आवाज दिला आहे.

यापूर्वी हृतिक रोशन, शाहिद कपूर, फरहान अख्तर, अजय देवगन अशा अनेक अभिनेत्यांसाठी सुमेधने आवाज दिला आहे. देशातल्या ग्रामीण भागापर्यंत तसंच खालच्या स्तरापर्यंत प्रत्येक विषय पोहोचावा यासाठी हा अभिनव प्रयोग रावबला गेला आहे.