शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

आलिया भट्ट चांगली गायक

WD
बॉलिवूडमध्ये अभिनयाने वेगळा ठसा उमटविणारी अभिनेत्री आलिया भट्ट ही एक चांगली गायिकाही असल्याचे समजते. नुकत्याच रिलीज झालेल्या ‘हायवे’ या सिनेमात तिने एक गाणेही गायले आहे. आलियाचा आवाज सुरेख असल्याने या सिनेमातील गाणे हीट होईल असे वाटते. आपली मुलगी गायिका असल्याचे माहीत नसल्याची कबुली सिनेनिर्माता महेश भट्ट यांनी दिली आहे. ‘स्टुडंट ऑफ द इअर’ फेम अभिनेत्री आलिया भट्ट गेल्याने काही दिवसांपासून भलतीच फॉर्ममध्ये आहे. काही दिवसापूर्वीच रिलीज झालेल्या ‘हायवे’ या सिनेमात तिने एक गाणेही गायले आहे. त्यामुळे ती चांगलीच फेमस झाली आहे. काही दिवसापूर्वीच रिलीज झालेला ‘हायवे’ हा आलियाचा दुसरा सिनेमा आहे. याबाबत महेश भट्ट म्हणाले, आलिया ही चांगली गाकिा आहे. ही माझ्यासाठी एक धक्कादायक गोष्ट होती. आलिया एवढे चांगलं गाऊ शकते, याचा मला थांगपत्ताही नव्हता. कधी सरस्वतीने तिच्यावर कृपा केली हे मलाही कळले नाही.