शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By

आलियाचा फोटो काढल्याने गमावली नोकरी

आलिया भट सध्या गौरी शिंदेसोबत गोव्यात एका चित्रपटाचं शूटिंग करण्यात व्यस्त आहे. पण, या फिल्मच्या सेटवर गौरी शिंदेचं रागीट रुप पाहायला मिळालं. याचा बळी ठरला सेटवरचा एक बॉडीगार्ड. 
 
त्याचं झालं असं की चित्रपटाचं शूटिंग सुरू असलेल्या ठिकाणी उपस्थित एका सुरक्षारक्षकाने आलियाच्या परवानगीशिवाय तिचा एक फोटो काढला. हे दृष्य पाहून गौरी शिंदे भडकली. तिने त्या सुरक्षारक्षकाला बोलावलं आणि त्याला दम दिला. 
 
पण, नंतर तिच्या रागाचा पारा इतका चढला की तिने त्याला त्वरित सेट सोडण्याचा आदेश दिला. तसेच त्याला नोकरीवर येऊ नकोस, असंही सांगितलं. आलियाच्या या चित्रपटात शाहरुख खानही दिसणार आहे. गोव्यात सध्या या चित्रपटाचं शूटिंग सुरू आहे. गौरी शिंदेने या आधी ‘इंग्लिश विंग्लिश’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे.