गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 जुलै 2016 (17:46 IST)

ऐश्वर्याने दिले रणबीरसोबत हॉट सीन, नाराज झाला बच्चन परिवार!

सध्या बच्चन परिवारात सर्व काही ठीक नाही आहे. याचे मुख्य कारण ऐश्वर्या राय बच्चन आहे. ऐश्वर्याने काही असे केले आहे ज्यामुळे तिचा संपूर्ण परिवार तिच्याशी नाराज झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या वृत्तानुसार बच्चन परिवाराचे नाराज होण्याचे मुख्य कारण ऐश्वर्याचे येणारे चित्रपट 'ए दिले मुष्किल' आहे. या चित्रपटात ऐश्वर्याने रणबीर कपूरसोबत काही हॉट सीन शूट केले आहे. ही बातमी जेव्हा बच्चन परिवाराला मिळाली तर त्यांनी ऐश्वर्यावर आपली नाराजी दर्शवली.  
 
ऐश्वर्याला सांगण्यात आले आहे की ती चांगल्या घराण्याची सून आहे, आणि तिला असे दृश्य देणे शोभत नाही. त्यानंतर ऐश्वर्याने डायरेक्टर करण जोहरला चित्रपटातून हे दृष्य काढण्याची मागणी केली आहे. आधीतर करण ने ही दृष्य हटवण्यास मना केले पण जेव्हा अमिताभ यांनी म्हटले तेव्हा ते दृश्य काढण्यास राजी झाला.