बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शनिवार, 3 जानेवारी 2015 (12:31 IST)

करिना कपूर बनणार संगीता बिजलानी?

क्रिकेटर अझरुद्दीनवर एक सिनेमा बनवला जातोय.. या सिनेमात अझरुद्दीनच्या पहिल्या पत्नीच्या भूमिकेत अभिनेत्री प्राची देसाई हिचं नाव निश्चित झाल्याचं समजतंय तर अझरची दुसरी पत्नी संगीता बिजलानी हिच्या भूमिकेत करिना कपूर खान दिसेल, अशी चर्चा सुरू आहे. 
 
‘बायोपिक’मध्ये आता आणखी एका सिनेमाची भर पडतेय. यामध्ये मोहम्मद अझरुद्दीनची भूमिका निभावतोय इमरान हाश्मी.. या सिनेमामुळे इमरानची ‘सीरियल किसर’ची इमेज मागे पडेल अशी आशा आहे.
 
प्राचीनं यापूर्वी इमरानसोबत ‘वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई’ या सिनेमात काम केलंय. हा सिनेमा सुपरहिट ठरला.. दोघांची केमिस्ट्रीही लोकांच्या पसंतीस उतरली होती. टोनी डिसूझा मोहम्मद अझरुद्दीनवर बायोपिक बनवणार आहे. या सिनेमात प्राची अझहरची पहिली पत्नी नौरीन हिच्या भूमिकेत दिसेल.
 
अझहर आणि नौरीन यांचं लग्न 1987 मध्ये झालं होतं. नऊ वर्ष दोघांचा संसार सुरू होता. त्यांना दोन मुलंही झाली.. असद आणि अयाज.. पण, 1996 मध्ये दोघांनी वेगळं होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अझहरनं अभिनेत्री संगीता बिजलानी हिच्याशी दुसरा विवाह केला. अझरचा मुलगा अयाज याचा 2011 मध्ये एका बाईक अपघातात निधन झालं यावेळी तो 19 वर्षाचा होता. 
 
नौरीनची भूमिका आव्हानात्मक असल्याचं प्राचीनं म्हटलंय. एका खूप प्रसिद्ध व्यक्तीची पत्नी असून लाईमलाईटपासून दूर राहणार्‍या त्याच्या पत्नीची ही भूमिका आहे. यापूर्वीही ‘वन्स अपॉन अ टाईम’मध्ये प्राचीनं मुस्लीम महिलेची भूमिका निभावलीय. पण, या भूमिकेसाठी प्राची लवकरच नौरीनची भेट घेणार आहे.