शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 29 ऑक्टोबर 2014 (12:06 IST)

कल्किनं शेअर केलंय तिचं दु:ख

मुंबईत आपल्या डोक्यावर छप्पर शोधणं हे एक महाकठिण काम आहे.. पण, जेव्हा यामध्ये तुमची जात, धर्म, लिंग, ओळख, रंग असे अनेक अडचणींचाही समावेश होतो, तेव्हा मात्र मानसिक त्रास होतो..
 
अशाच मानसिक त्रासातून सध्या अभिनेत्री कल्कि कोचलीन प्रवास करतेय.. तिला नाहक मनस्ताप सहन करावा लागतोय.. कारण, मुंबईच्या वर्सोवा भागात कल्की सध्या एका घराच्या शोधात आहे.
 
वर्सोवा हा मुंबईचा एक सफेदपोश भाग.. अनेक नामवंत हस्तींचं राहण्याचं ठिकाण म्हणून ओळखलं जातं.. इथल्या बडय़ा-बडय़ा बंगल्यांमध्ये बॉलिवूडच्या अनेक तार्‍यांनीही आपलं आभाळ थाटलंय.. असंच काहीसं स्वप्न घेऊन आलीय कल्की कोचलीन.. पण, तिचं काही स्वप्न पूर्ण होताना दिसत नाहीये. 
 
कल्किला सध्या घरच मिळत नाहीये.. तिनं आपलं हे दु:ख सोशल वेबसाईट ट्विटरवर आपल्या चाहत्यांशी शेअर केलंय.. ‘एक गोरी, एकटी आणि खासकरून बॉलिवूडमध्ये काम करणार्‍या महिलांना वर्सोवामध्ये भाडय़ानं फ्लॅट शोधणं काही साधं-सुधं काम नाही’. तुम्हीही कल्किचे फॅन्स असाल तर पाहा, काही मदत करता येतेय का ते..