गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 29 मे 2015 (14:23 IST)

कवीने अमिताभकडे केली 1 कोटी भरपाईची मागणी

कोर्ट में कुत्ता या गाजलेल्या कवितेच्या कवीने अमिताभ बच्चन यांच्याकडे 1 कोटी रूपये नुकसानभरपाईची मागणी केली असल्याचे वृत्त आहे. डॉ.जगबीर राठी असे या कवीचे नाव असून ते हरियाणाचे लोककलाकार आहेत आणि त्यांची ही कविता खूपच गाजली आहे.
 
मिळालेल्या माहितीनुसार अमिताभ बच्चन यांनी ही कविता कवीच्या परवानगीशिवाय त्यांच्या अधिकृत ङ्खेसबुक व टिटर अकौंटवर पोस्ट केली. त्यासंदर्भात अमिताभ बच्चन यांच्याशी कवींच्या समर्थकांनी पत्रव्यवहार केला, ई मेल केले मात्र त्याला प्रत्युत्तर मिळाले नाही. वास्तविक ही कविता अमिताभचे ङ्खॉलोअर विकास दुबे यांनी पोस्ट केली मात्र अमिताभने ती पोस्ट पुढे कॅरी केली व त्याला अनेकांचे लाईकही आले. अमिताभचे ङ्खेसबुकवर 20 लाखांहून अधिक ङ्खॉलोअर आहेत. आमिताभकडून यासंदर्भात कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने अखेर त्यांच्यावर 1 कोटी रूपये नुकसानभरपाईचा दावा केला गेला असे समजते. गेले महिनाभर कवीचे समर्थक ही पोस्ट हटवा म्हणून पत्रव्यवहार करत आहेत, अमिताभच्या सचिवांशीही संपर्क साधला मात्र काहीही उपयोग झाला नाही.
 
विकास दुबे यांच्याविरोधातही आय टी अँक्ट व कॉपीराईट भंगाविरोधात दावा दाखल केला जात असल्याचे सांगितले जात आहे.