गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 18 जुलै 2014 (15:30 IST)

काऊबॉय रजनीकांत

रजनीकांतचा ‘कोच्चडियान’नंतर ‘लिंगा’ सिनेमा यावर्षी प्रदर्शित होत आहे. रजनीकांतच्या ‘लिंगा’मध्ये वेगवेगळ्या लूकचा समावेश आहे.

सिनेमात अभिनेत्री म्हणून सोनाक्षी सिन्हा काम करत आहे. रजनीकांतसोबतचा तिचा हा पहिलाच सिनेमा आहे. ‘लिंगा’मध्ये रजनीकांत-सोनाक्षीवरती एक रोमँटिक गाणे चित्रीत करण्यात येणार आहे. रजनीकांत या गाण्यामध्ये काऊबॉयच्या रूपात दिसणार आहे.

गाण्याचे शूटिंग लवकरच करण्यात येईल. सिनेमातील अँक्शन-इमोशनचे शूटिंग पूर्ण झाले असून या गाण्याचे शूटिंग वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात येणार आहे.

ए. आर. रहमानने या गाण्याला संगीत दिले आहे. डिसेंबरमध्ये रजनीकांतचा 64 वा वाढदिवस असून त्या दिवशी हा सिनेमा प्रदर्शित करण्याचे दिग्दर्शकांचे नियोजन आहे.