गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. »
  3. बॉलीवूड
  4. »
  5. सिनेगप्पा
Written By वेबदुनिया|

काजोल करणार शाहरुख सोबत काम

ND
काजोलने करण जोहरच्या 'माय नेम इज खान' मध्ये काम करण्यास सहमती दर्शवली आहे. काजोलला या चित्रपटाचा प्रस्ताव बराच आधी आला होता. पण ‍‍तेव्हा याबद्दल काहीच निश्चित नव्हते. नंतर तिच्या पित्याचे निधन झाल्यामुळे तिने निर्णय घेण्यास अजून थोडा वेळ घेतला. नंतर तिने चित्रपटाचे संपूर्ण स्क्रिप्ट वाचले व काम करण्यास होकार दिला.

चित्रपटाचे शूटिंग अमेरिकेत होणार आहे आणि‍ तची मुलगी अजून लहान आहे. म्हणून काजोल हा चित्रपट स्वीकारावा की नाही या संभ्रमात होती. पण करणने यावरही तोडगा काढला आहे. काजोलने या चित्रपटात काम केले नसते तर तिच्याजागी करीनाला घेतले जाणार होते.