शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : शुक्रवार, 26 सप्टेंबर 2014 (13:35 IST)

काश्मीरच्या आठवणींत शाहीद!

‘फटा पोस्टर निकला हिरो’ आणि ‘आर. राजकुमार’ ने तिकीट खिडकीवर चांगलं प्रदर्शन केलं. आता शाहीद कपूरचं लक्ष आहे, ते हैदर या आगामी चित्रपटावर. पण शाहीद निराश नक्कीच नाही. कित्येक वर्ष, तो बॉलिवूडमधील चढ-उतार अनुभवतो. यातून तो बरंच काही शिकलादेखील आहे. आपलं काम करत यशाची वाट पाहणं, यातच खरं शहाणपण आहे, हेही शाहीदला चांगलं ठाऊक आहे. काही दिवसांपूर्वीच शाहीद हैदरचं काश्मीरमधलं चित्रीकरण संपवून मुंबईत परतला आहे. सध्या काश्मीरवर नैसर्गिक संकट ओढवंल. हे संकट जितकं आपल्याला बोचणी लावून गेलं, त्यापेक्षा जास्त शाहीदच्या मनात बोचणी लावणारं ठरलंय. कारण शाहीदचं काश्मीरशी जवळचं नातं आहे. जेव्हा केव्हा शाहीदच मनात काश्मीर तरळतं, जेव्हा त्याच्या डोळ्यासमोर काही चित्रं येतात. यात जास्त करून शम्मी कपूर यांच्या चित्रपटांत दिसलेली असतात. ज्यात शम्मी कपूर येथील बर्फाळ प्रदेशात नाचता-बागडताना दिसतात. अजून एक अस्पष्ट चित्रंही शाहीदच्या डोळ्यांसमोर तरळत असतं, ते म्हणजे तो छोटा असतानाचं, त्याच्या आईसोबत काश्मीरला गेला असतानाचं. त्यावेळी त्याने दल लेकमधील हाऊस बोटीवर आपला काही वेळ व्यतित केला होता. हैदरच चित्रीकरणादरम्यान, शाहीदला काश्मीर अधिक चांगल्यारीतीने समजून घेता आलं.